शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अभ्यास करत नसल्याने पोटच्या मुलाचा आईने उशीने दाबला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 01:31 IST

मातृत्वाच्या नात्याला काळीमा लावणारी घटना शहरातील इंदिरा नगर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या साडेतीन वर्षाचा चिमुकला ऑनलाइन अभ्यास करत नाही, या क्षुल्लक कारणावरून आलेला राग मातेला अनावर होतो अन‌् ती उशीने आपल्या बेडरुममध्ये मुलाचे तोंड दाबून त्याचा श्वास कायमचाच थांबविते अन‌् त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपविते, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना पोलिसांच्या तपासातून उघडकीस आल्याने हळहळ अन‌् संताप व्यक्त होत आहे. पाथर्डी फाटा भागातील सोमवारी (दि.९)

ठळक मुद्देमातेनेही घेतला गळफास : अखेर इंदिरा नगरच्या मायलेकाच्या मृत्युचे गूढ उकलले

नाशिक : मातृत्वाच्या नात्याला काळीमा लावणारी घटना शहरातील इंदिरा नगर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या साडेतीन वर्षाचा चिमुकला ऑनलाइन अभ्यास करत नाही, या क्षुल्लक कारणावरून आलेला राग मातेला अनावर होतो अन‌् ती उशीने आपल्या बेडरुममध्ये मुलाचे तोंड दाबून त्याचा श्वास कायमचाच थांबविते अन‌् त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपविते, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना पोलिसांच्या तपासातून उघडकीस आल्याने हळहळ अन‌् संताप व्यक्त होत आहे.

पाथर्डी फाटा भागातील सोमवारी (दि.९) साई-सिद्धी अपार्टमेंटमधील राहत्या घरात शिखा सागर पाठक (३२) हिने आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना स्वत:च्या बेडरूमचा दरवाजा बंद करून घेत गळफास लावून आत्महत्या केली तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला. पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मृतदेहांजवळ पोलिसांना एक सुसाइड नोटदेखील लिहिलेली आढळून आली होती. या घटनेने पाथर्डीफाटा परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महिलेच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय असेल? आणि मुलगा रिधानचा कसा मृत्यू झाला, याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना मंगळवारी या मायलेकाच्या मृत्युचे गुढ उकलले. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास करत छडा लावला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपासाला गती दिली. मंगळवारी दुपारी या घटनेमागील गूढ पोलिसांनी संपुष्टात आणले. मृत शिखा यांच्यावर इंदिरा नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले.

---इन्फो---

आजी-आजोबांसह चिमुकल्याचे वडीलही हादरले

मुलगा रिधान याने अभ्यास करावा, हुशार व्हावे, यासाठी शिखा सतत त्याला बाेलत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बराच वेळ होऊनही मुलगी आणि नातू घरातून बाहेर येत नाही म्हणून तिच्या आई-वडिलांनी आरडाओरड करत जोरजोराने दार वाजविण्यास सुरुवात केली. शेवटी सागर पाठक यांनी दार ताेडले असता मायलेक मृतावस्थेत आढळून आल्याने या तिघांनाही मोठा धक्का बसला.

---इन्फो---

सुसाइड नोटमध्ये कोणाविषयी तक्रार नाही

मायलेकांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यात आलेली नव्हती. मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमधील मजकूर आणि घरातील व्यक्तींशी केलेल्या चर्चेतून तसेच शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी तपास करत प्रत्यक्ष घटनास्थळावरील परिस्थितीनुसार शिखाने मुलाची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचे निष्पन्न केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी