सासे खून प्रकरण; तिघा संशयितांना अटक

By Admin | Updated: June 6, 2015 00:24 IST2015-06-06T00:18:59+5:302015-06-06T00:24:21+5:30

सासे खून प्रकरण; तिघा संशयितांना अटक

Mother-in-law case; Three suspects arrested | सासे खून प्रकरण; तिघा संशयितांना अटक

सासे खून प्रकरण; तिघा संशयितांना अटक

नाशिक : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शैलेश दत्तात्रय सासे (२५ रा. भोई गल्ली) या तरुणाच्या खून प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तिघा संशयितांना शुक्रवारी सकाळी सापळा रचून अटक केली असून, यामध्ये सराईत गुन्हेगाराचाही समावेश आहे़ या घटनेनंतर संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालयात तोडफोड करून पोलिसांवरही हल्ला केला होता़ यामध्ये सहायक पोलीस उपआयुक्त रवींद्र्र वाडेकर जखमी झाले आहेत़
मयत शैलेश सासे हल्ला प्रकरणातील संशयित संतोष श्याम कोतेवाड, जुनेद चौधरी (दोघेही रा़ काठे गल्ली), अक्षय युवराज पाटील (सातपूर) हे तिघेही मुंबई नाक्यावर असल्याची माहिती भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली़ त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, वारे, मनोज डोंगरे, कविश्वर खराटे, विजू लोंढे, लभडे यांनी सापळा रचून अटक केली़ या तिघांनाही उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Mother-in-law case; Three suspects arrested