शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
3
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
4
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
5
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
6
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
7
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
8
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
9
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
10
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
11
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
12
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
13
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
14
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
15
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
16
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
17
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
18
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
19
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
20
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 11:42 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : एकाच महिन्यात मृतांचा आकडा पाचशेवर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते. नाशिक जिल्ह्यात पहिला रु ग्ण मार्च महिन्यामध्ये आढळला मात्र पहिला रु ग्ण सापडल्यानंतर तो १४ दिवसांनी खडखडीत बरा होऊन घरी गेला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र उत्तरार्धात कोरोना बाधित बारा जणांचा बळी गेला तर मे महिन्यात त्यात दोनने वाढ होऊन चौदा नागरिक मृत्युमुखी पडले. जून महिन्यात प्रथमच मृतांच्या संख्येने तीन आकडी संख्या ओलांडत १६६ चा आकडा काढला. जुलै महिन्यात तब्बल २६१ नागरिक मृत्युमुखी पडले तर आॅगस्टमध्ये त्यात पुन्हा शंभराहून अधिक बळींची भर पडत हा आकडा ३७३ वर पोहोचला सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने जवळपास पाचशेची मजल मारली होती. महिन्याला पाचशे बळींचे प्रमाण कुणाही नागरिकाला भितीदायकच वाटू लागले होते.त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयÞापासून रु ग्णवाढीचे तसेच मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याचे दिसून आले.अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येतही घटसप्टेंबरमध्ये अ‍ॅक्टीव्ह अर्थात उपचारार्थी रु ग्णांची संख्या दहा हजाराच्या उंबरठयÞावर जाऊन पोहोचली होती. तीदेखील हळूहळू कमी होत ८ आॅक्टोबरला ९ हजाराच्या खाली आल्याने या प्रमाणातही काहीशी घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासकीय स्तरावरून देखील कोरोना चा कहर आता हळूहळू कमी होऊ लागल्याचे अधिकृत रित्या सांगितले जात असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .उपचाराला उशीर बेततो जीवावर !सहा महिन्यांपासून सातत्याने कोरोनाच्या लक्षणांबाबतचा प्रचार होत असूनही काही नागरिक आपल्याला व्हायरल फिव्हर असेल, अशी मनाची समजूत करु न घेत घरगुती उपचार किंवा स्वत:च मेडीकलमधून गोळया आणून उपचार करतात. मग आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्रास खूप वाढल्यावर मग कोरोनावरील उपचारांसाठी धावाधाव करतात. शरीरातील आॅक्सिजनची पातळी तोर्पयत खालावली असल्यास मग संबंधित रु ग्णाच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडत असून वेळीच वैद्यकीय सल्ला न घेणाऱ्यांच्याच मृत्युचे प्रमाणदेखील मोठे असल्याचे निदर्शनास येत आहे.फोटो- १२ कोरोना ग्राफ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल