नाशिक विभागात सर्वाधिक रुग्णांची तपासणी
By Admin | Updated: March 4, 2015 01:53 IST2015-03-04T01:49:31+5:302015-03-04T01:53:01+5:30
नाशिक विभागात सर्वाधिक रुग्णांची तपासणी

नाशिक विभागात सर्वाधिक रुग्णांची तपासणी
नाशिक :जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात तेरा, तर खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्ण उपचार घेत असून, औषधसाठा व मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत़ जिल्ह्यातील पावसाळी वातावरणात बदल होऊन ऊन पडल्याने या रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे शक्यताही व्यक्त केली जाते आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल होणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांसाठी सेंट्रल ओटूच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ यामुळे दोन रुग्णांची सोय होणार आहे़
१ जानेवारी ते १ मार्च २०१५ या कालावधीत संपूर्ण नाशिक विभागात (अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक) ९,६६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर १,०२० रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत़ यामध्ये शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी ५६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ त्यापैकी ३७ रुग्ण उपचार घेत असून, विभागात या रोगामुळे आतापर्यंत नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ नाशिक विभागात सर्वाधिक रुग्णांची तपासणी नाशिक जिल्ह्यातच करण्यात आली आहे़