सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाणला

By Admin | Updated: May 9, 2014 23:55 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-09T23:55:26+5:30

आरोग्य समिती बैठक; उमेदवार भारती पवार यांची हजेरी

Most Contaminated Water Supply Baglanalaya | सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाणला

सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाणला

आरोग्य समिती बैठक; उमेदवार भारती पवार यांची हजेरी
नाशिक : जिल्‘ात उन्हाळा सुरू होताच दूषित पाणीपुरवठा करण्याच्या संख्येतही वाढ होत असून, सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाण तालुक्यात, तर खालोखाल दिंडोरी व कळवण तालुक्यात होत असल्याची माहिती आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत उघड झाली.
आरोग्य समितीची बैठक सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत आरोग्य विभागाकडील योजनांसह दूषित पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय पाणी नमुने तपासणीचा अहवाल पुढीलप्रमाणे (कंसात दूषित पाणीपुरवठ्याची टक्केवारी)- कळवण- घेण्यात आलेले पाणी नमुने- २२९, दूषित पाणी नमुने- ९१ (४०), बागलाण- १०६-६९ (६५), त्र्यंबकेश्वर- १०७-३६ (३४), सुरगाणा- १७६-२० (२८), देवळा- ९४-२६ (२८), पेठ- ५४-२२ (४१), इगतपुरी- १३२-१७ (१३), दिंडोरी- ७२-४१ (५७), नाशिक- ११४-३३ (२७), सिन्नर- ५१-१४ (२७), चांदवड- ७८-०७ (०९), निफाड- १५१-३५ (२३), नांदगाव- ८३-१६ (१९), येवला- ७३-१५ (२१), मालेगाव- १००-१७ (१७) असे एकूण १६२० पाणी नमुने प्राप्त होऊन दूषित आढळलेल्या पाणी नमुन्यांची संख्या ४५९ इतकी म्हणजेच सरासरी २८ इतकी आहे. त्यातही विशेष म्हणजे साथरोग आजारांचा आढावा घेण्यात आला असता धक्कादायक माहिती समोर आली. जिल्‘ात एकाही ठिकाणी साथरोगाचा उद्रेक झालेला नसल्याने हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या यांसह विविध आजारांची लागणच झालेली नसल्याचे नमूद करण्यात आल्याने हा अहवाल खरा की खोटा, अशा संशय निर्माण झाला आहे. बैठकीस यतिन पगार, सिंधूताई सोनवणे, शरद माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून दिंडोरी लोकसभेची उमेदवारी करणार्‍या जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांनीही बैठकीस हजेरी लावली. (प्रतिनिधी)

Web Title: Most Contaminated Water Supply Baglanalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.