आरोग्य, ड्रेनेज विभागाच्या सर्वाधिक तक्रारी
By Admin | Updated: May 6, 2017 01:59 IST2017-05-06T01:58:21+5:302017-05-06T01:59:12+5:30
गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे सर्वाधिक तक्रारी या आरोग्य आणि ड्रेनेज विभागाच्या प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोग्य, ड्रेनेज विभागाच्या सर्वाधिक तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक १५१ वा आल्यानंतर शहरातील स्वच्छतेबाबत लोकप्रतिनिधींकडून प्रशासनावरच तोंडसुख घेतले जात आहे. गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे सर्वाधिक तक्रारी या आरोग्य आणि ड्रेनेज विभागाच्या प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, समस्यांची तड लावण्यात दोन्ही विभाग कमी पडल्यानेच स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक घसरून देशात नाचक्की झाल्याचा आरोप आता लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत आलेल्या पथकाने शहरातील स्वच्छतेचा आढावा घेत तपासणी केली होती. त्यात वेगवेगळ्या स्तरावर पाहणी करत नागरिकांची मतेही जाणून घेण्यात आली होती. स्मार्ट सिटी अभियानात समाविष्ट झालेल्या नाशिक महापालिकेने मोबाइल अॅपसह विविध स्तरावर तक्रार निवारणासाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेतला असता १ जानेवारी ते ५ मे २०१७ या कालावधीत आरोग्य व ड्रेनेज विभागाच्याच सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.