पाणवेलीतील डासांमुळे पंचक्रोशीतील नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:48+5:302021-03-13T04:26:48+5:30
एकलहरे गावाजवळ गोदावरी नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यापासून नांदूर - मानूरपर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटर परिसरात नदीवर पाणवेली ...

पाणवेलीतील डासांमुळे पंचक्रोशीतील नागरिक हैराण
एकलहरे गावाजवळ गोदावरी नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यापासून नांदूर - मानूरपर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटर परिसरात नदीवर पाणवेली साचल्या असून, नदीच्या दोन्ही तीरावर दसक, पंचक, माडसांगवी, शिलापूर, गंगावाडी, एकलहरेगाव, ओढा, लाखलगाव ही गावे आहेत. येथील नागरिकांना व जनावरांनाही पाणवेलीवरील डासांचा प्रचंड त्रास होतो. शिलापूर हे गाव नदीच्या लगत आहे. या ठिकाणी सायंकाळ झाली की घराच्या बाहेर बसणेही अवघड झाले आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांमुळे मुक्या जनावरांची अवस्था बिकट झाली असून, दुधाळ जनावरांच्या दुधावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. डासांपासून बचावासाठी गुरांच्या गोठ्यातून धूर केला जातो, तर काही शेतकऱ्यांनी चक्क मच्छरदाणीच गोठ्याभोवती बांधली आहे. संबंधित पाटबंधारे विभागाने या पाणवेली नष्ट कराव्यात, अशी मागणी शिलापूरचे हरिश्चंद्र बोराडे यांनी केली आहे.
(फोटो १२ पानवेली) -एकलहरे परिसरात गोदावरी पात्रात साचलेली पाणवेली.