रब्बीच्या भांडवलासाठी कारभारणीचे मंगळसूत्र बँकांकडे गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 02:18 PM2019-11-21T14:18:57+5:302019-11-21T14:19:07+5:30

पाटोदा :- येवला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...

 Mortgage to Mangalsutra Banks for rabi capital | रब्बीच्या भांडवलासाठी कारभारणीचे मंगळसूत्र बँकांकडे गहाण

रब्बीच्या भांडवलासाठी कारभारणीचे मंगळसूत्र बँकांकडे गहाण

googlenewsNext
ठळक मुद्देपाटोदा परिसरात कामांची लगबग : शेतकऱ्यांची मका सोंगणीसह चारा साठवण्याची धावपळ


पाटोदा :- येवला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.त्याचे भांडवल संपले असल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतात पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाला आधीच दोन महिने उशीर झाला असून अजून उशीर नको म्हणून शेतकरी वर्गाने नुकसान भरपाई अनुदानाची वाट न पहाता आपल्या कारभारणीचे मंगळसूत्र व इतर दागिने बँकांकडे गहाण ठेवून तसेच उधार उसनवार करून रब्बी हंगामाची तयारी केली असून सर्वत्र रब्बी हंगामाची लगबग सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या बैल मशागतीला वेळ लागत असल्याने शेतकरी वर्गाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले असून ट्रक्टरच्या मदतीने नांगरणी , फणने रोटरी मारणे अशी कामे केली जात असल्याने हा व्यवसाय करणार्या ट्रक्टर मालकांना चांगले दिवस आले आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिके सडून गेल्याने आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखीनच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. असे असले तरी शेतकरी वर्गाने हार न मानता रब्बी हंगामाच्या कामाला लागला आहे. या भागात मका पिकाचे क्षेत्र मोठे असून शेतकऱ्यांची मका सोंगणी व चारा साठवण्याची धावपळ सुरु आहे. आजही काही शेतात पाणी साचल्याने दलदलीचे साम्राज्य असल्याने मका सोंगणीसाठी अडथळा येत आहे. पाणी उपलब्ध राहाणार असल्याने या भागात गहू हरभरा,या पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकरी वर्गाने या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे.तर नगदी पिक म्हणून कांदा पिकाची मोठया प्रमाणात लागवड केली जाते.पाटोदा परिसरात कांदा लागवडीसाठी शेतकर्यांची धावपळ सुरु आहे.पावसाने कांदा रोपे सडून गेली आहे मात्र ज्या जमिनी उंच सखल तसेच मुरूमट होत्या अशा जमिनीमधील कांदा रोपांनी काही प्रमाणात तग धरल्याने शेतकरी वर्गाने कांदा लागवड सुरु ठेवली आहे. सध्या कांद्यास मिळत असलेला बाजारभाव पुढील काळातही मिळणार असल्याच्या कयास शेतकर्यांनी बांधला असल्याने कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.ज्या शेतकर्यांकडे कांदा रोपे शिल्लक नाही असे शेतकरी कांदा रोप विकत घेऊन कांदा लागवड करतांना दिसत आहे.सध्या कांदा रोपाला सोन्याचे दिवस आले असून एक पायलीचे कांदा रोप सुमारे पन्नास ते साठ हजार रु पयांना विकले जात आहे. ही महागडे रोपे घेण्यातही शेतकरी वर्गात चढाओढ लागली आहे. त्यामुळे ज्याच्याकडे कांदा रोप आहे आशा शेतकºयांना सुगीचे दिवस आले आहे.

Web Title:  Mortgage to Mangalsutra Banks for rabi capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक