नांदगाव तहसीलदारपदी मोरे; देवळ्याला विजय सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:15+5:302021-09-19T04:15:15+5:30
नांदगाव/देवळा : नांदगाव आणि देवळा तालुक्याच्या तहसीलदारपदी नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत. नांदगावचे तहसीलदार उदय कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्याने येथील ...

नांदगाव तहसीलदारपदी मोरे; देवळ्याला विजय सूर्यवंशी
नांदगाव/देवळा : नांदगाव आणि देवळा तालुक्याच्या तहसीलदारपदी नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत. नांदगावचे तहसीलदार
उदय कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्याने येथील तहसीलदारांचे पद रिक्त झाले होते. त्या जागी अमरावती जिल्ह्यात मोशी येथे कार्यरत असलेल्या सिद्धार्थकुमार मोरे यांची बदली झाली आहे. तर देवळ्याच्या तहसीलदारपदी विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे.
दीड महिन्यांपासून रिक्त असलेल्या देवळा तालुक्याच्या तहसीलदारपदी सुरगाणा येथे कार्यरत असलेले तहसीलदार विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. मागील दीड महिन्यापूर्वी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांची बदली झाल्यानंतर देवळा तालुका तहसीलदारपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तत्कालीन देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांची बदली झाल्यानंतर जवळपास एक-सव्वा महिना प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे यांनी येथील तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळला. रिक्त असलेल्या जागी सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे विजय सूर्यवंशी यांची देवळा तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली असून शुक्रवार दि. १७ रोजी याबाबत शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.