शहरात एकाच दिवसात चौदाशेहून अधिक चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:53 IST2021-03-16T23:19:27+5:302021-03-17T00:53:02+5:30
नाशिक- शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा सुपर स्प्रेडर्सला वेळीच शोधून त्यावर उपचार करण्याची रणनीती महापालिकेने आखली आहे. त्या अंतर्गत तीस पथके तयार करण्यात आली असून त्यांनी आरटीपीसीआर आणि ँअटीजेन अशा चौदशे चाचण्या करण्यात आल्या आहेत. अर्थात, चाचण्या त्वरित करण्यात आल्या असल्या तरी प्रलंबित अहवालांची संख्या चार हजाराहून अधिक असल्याने या चाचण्यांचे अहवाल कधी मिळणार हा प्रश्नच आहे.

शहरात थेट नागरिकांशी संबंधीत असलेले व्यवसायिक किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्यामुळे अन्य नागरिकांना देखील संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे असे व्यवसायिक किंवा कर्मचारी सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात. त्यामुळे त्यांची चाचणी करून संसर्ग रोखण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार दुकानदार, भाजीवाले, रिक्षा चालक इतकेच नव्हे तर सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरूवात करण्यात आली. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील तपासणी सुरू करण्यात आली असून त्यासाठी तीस पथके नियुक्त करण्यात आले आहे. मंगळवारी एका दिवसात १४०० कोरोना बाधीतांची चाचणी करण्यात आली आहे. अर्थात, साधारणत: चोवीस तासात चाचणीचा अहवाल प्राप्त होणे क्रमप्राप्त असले तरी सध्या सुमारे चार हजार अहवाल प्रलंबीत आहेत. त्यात नाशिक महापालिकेच्या १ हजार ६८ नमुन्यांचा देखील प्रलंबित अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेला जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून लवकरात लवकर अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
शहरातील बहुतांशी कोरोना चाचण्यांचे नमूने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र, तेथून अहवाल येण्यास विलंब झाल्याने महाालिकेने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत नमूने पाठवणे बंद केले असून त्याऐवजी मुंबईच्या हाफकिन्समध्ये नमूने पाठवले जात आहेत परंतु त्याची क्षमताही अवघी दोनशे नमुन्यांचीच आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालात महापालिकेचे सुमारे पाचशे नमूने तपासणी विना पडून आहेत. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढण्याची प्रतीक्षा आहे.