लॉकडाऊनमध्ये अधिक बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:44 IST2020-09-03T22:33:07+5:302020-09-04T00:44:11+5:30
कळवण : शहरातील व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महावितरणच्या वाढीव बिलासंदर्भात उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देताना नंदकुमार खैरनार, दीपक खैरनार, सुधाकर पगार, विकास देशमुख, निंबा पगार, गोविंद कोठावदे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : शहरातील व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता सरासरीपेक्षा अवाजवी आकारण्यात आलेले वाढीव बिल कमी करून त्यांची योग्य ती वीज आकारणी करण्यात यावी आणि लॉकडाऊन काळ, त्यात अवाजवी बिल यामुळे शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक, आदिवासी वस्ती, पाडे, सामान्य नागरिक आदी लोकांचे महावितरण विभागाकडून एक प्रकारे वाढीव दर आकारून आर्थिक संकट उभे केल्याचे दिसून येत आहे तरी या संदर्भात आपल्याकडून लोकांच्या समस्या जाणून जनतेला सकारात्मक दिलासा मिळाला पाहिजे व वेळेत आपल्या यंत्रणेकडून रीडिंग घेतले गेले पाहिजे जेणेकरून अतिरिक्त चार्जेस वाढवून जनतेचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच लॉकडाऊन काळातील वीजबिलांची वसुली एकदम न करता त्याचे टप्पे करण्यात यावे जेणेकरून ते भरण्यास जनतेला अडचण येणार नाही व तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात यावा. निवेदनानुसार अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी शिष्टमंडळात भाजपचे नंदकुमार खैरनार, विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, राजेंद्र पगार, गोविंद कोठावदे, काशीनाथ गुंजाळ उपस्थित होते.