शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे नाशिककडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:31 IST

राज्यातील नॉनमेट्रो शहरांमध्ये नाशिक झपाट्याने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या विविध प्रकल्पांमध्ये सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे एका मालमत्ता सल्लागार संस्थेने स्थानिक बांधकाम व्यावसायिक संघटना व खासगी अर्थसहाय संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘नाशिक अमर्याद संधींची भूमी’ या संशोधन अहवालातून समोर आले आहे.

ठळक मुद्देसंशोधन अहवाल : क्रेडाईसह मालमत्ता सल्लागार संस्थेने केले सर्वेक्षण

नाशिक : राज्यातील नॉनमेट्रो शहरांमध्ये नाशिक झपाट्याने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या विविध प्रकल्पांमध्ये सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे एका मालमत्ता सल्लागार संस्थेने स्थानिक बांधकाम व्यावसायिक संघटना व खासगी अर्थसहाय संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘नाशिक अमर्याद संधींची भूमी’ या संशोधन अहवालातून समोर आले आहे.नाशिकमध्ये शहराचे वातावरण आणि विकासाला असलेला वाव यामुळे गुंतवणूकदारांची नाशिकला मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, संमिश्र जमिनीचा वापर व साचेबद्धपणासोबतच सांडपाणी, कचरा व्यवस्थापन याबाबीत नाशिक शहराने अहमदाबाद, भुवनेश्वर, कोईम्बतूर, हैदराबाद, नागपूरसह अगदी ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरांनाही मागे टाकले आहे.स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या नाशिकमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी असून, नाशिक हे प्रमुख एज्युकेशनल हब व आयटी-आयटीई स्टार्ट-अप हब बनले असल्याचे नमूद करतानाच नाशिकच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंभनगरीसह वाइनसिटी म्हणून असलेली ओळख या गुणवैशिष्ट्यांवर या अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. क्रेडाई नाशिकसह अ‍ॅनारॉक या संस्थेने हा अहवाल एका खासगी अर्थसाहाय्य संस्थेच्या सहकार्याने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.नाशिक शहरात नव्यानेच सुरू झालेल्या विमानसेवेचा आगामी काळात आणखी विस्तार होण्याचे संकेत आहे. तसेच मुंबई-पुण्यासारख्या शहरांना जोडणारे उत्कृष्ट रस्ते यासोबतच नाशिकमध्ये ९०४ नवीन आणि सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी ७२६ प्रकल्प महारेरा नोंदणीकृत आहेत. यातील व्यावसायिक इमारतींचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळेच शहरात २५ पेक्षा जास्त स्टार्टअपसह सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी शहरावर लक्ष केंद्रित केले असल्याचा निष्कर्ष ‘नाशिक अमर्याद संधींची भूमी’ या अहवालातून काढण्यात आला आहे.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकNashikनाशिक