शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या निषेधार्थ ढोल-ताशा वाजवून मोर्चा

By admin | Updated: September 10, 2016 00:28 IST

आश्वासन : गणेशोत्सवात गणेशभक्तांना अखंड वीजपुरवठा

लासलगाव : सततच्या अखंडित वीजपुरवठ्यामुळे पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील गणेश मंडळांनी महावितरणच्या निषेधार्थ शहरातून ढोल-ताशाच्या गजरात मोर्चा काढून महावितरणचे सहायक अभियंता यांना निवेदन दिले. महावितरणचे सहायक अभियंता आर. एस. चव्हाण यांनी अखंडित वीजपुरवठ्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा गणेशोत्सवात सुरळीत करून गणेशभक्तांना अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.लासलगाव शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी गणेशभक्तांनी केली. महावितरणचे कर्मचारी हलगर्जी करत असल्यामुळे दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. यातून महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला असून, गणेशोत्सवात बालगोपाल, तरु णाई, अबालवृद्ध यांच्यात उत्साह असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने त्यांच्या उत्साहात विरजण पडत आहे.विजेचा नाहक फटका गणेश भक्तांना व बकरी ईद साजरी करण्यांना सहन करावा लागत आहे. वीज देयके वसुलीप्रमाणे सेवा देण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठांनी चाप लावावा. आणि सण उत्सवावर येणारे महावितरणचे संकट दूर करावे, अशी मागणी गणेशभक्तांमधून जोर धरत आहे.यावेळी मोर्चकरांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचला. यामध्ये सडलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफार्मर यासह अनेक तक्र ारी यावेळी करण्यात आल्या. यावेळी लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व महावितरणचे सहायक अभियंता आर. एस. चव्हाण यांनी लवकरात लवकर गैरसोयींवर तोडगा काढण्यात येईल, असे मोर्चेकरांना आश्वासन दिले. वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा सुरळीत करून गणेशोत्सवात गणेशभक्तांना विनाखंड वीजपुरवठा करण्यात येईल, असेही आश्वासन दिले.परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांनी वेठीस धरू नये अन्यथा महावितरणला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील व गणेशभक्तांनी दिला. यावेळी भय्या भंडारी, सुरज नाईक, गणेश इंगळे, दत्ता पाटील, राजू कराड, अभिजित जाधव, सचिन जैन, शोभराज बागमार, अश्विन शिंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)