शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

इगतपुरीत मुस्लीम महिलांचा सरकारविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:32 AM

‘शरियत के लिये कुर्बान हो जायेंगे, कुरआन हमारी जान है’ अशा घोषणा देत सरकारविरोधात शहरातील शरियत बचाव तालुका कमिटीने अरब मस्जिद ते पोलीस ठाण्यापर्यंत मुस्लीम महिलांनी भव्य मोर्चा काढला. केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाक विधेयक मांडले, तसेच राज्य सभेतही ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशातील मुस्लीम समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

इगतपुरी : ‘शरियत के लिये कुर्बान हो जायेंगे, कुरआन हमारी जान है’ अशा घोषणा देत सरकारविरोधात शहरातील शरियत बचाव तालुका कमिटीने अरब मस्जिद ते पोलीस ठाण्यापर्यंत मुस्लीम महिलांनी भव्य मोर्चा काढला. केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाक विधेयक मांडले, तसेच राज्य सभेतही ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशातील मुस्लीम समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.  केंद्र शासनाच्या या धोरणाविरोधात इगतपुरी तालुका मुस्लीम महिला आणि शरियत बचाव कमिटीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी मूक मोर्चाद्वारे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे व महिला पोलीस सहायक निरीक्षक रामेश्वरी पांढरे यांना मुस्लीम महिला कमिटीच्या प्रमुख व नगर परिषद बांधकाम विभागाच्या  सभापती सीमा प्रल्हाद जाधव, रजिवाना खान, अफरीन सय्यद, जैनब शेख, निलोफर खान यांच्या हस्ते निवेदन दिले.भावना दुखावल्या जातीलप्रस्तुत बिल मंजूर झाल्यास शरियतचा अवमान होऊन धार्मिक भावना दुखावल्या जातील. भारतीय राज्य घटनेने देशात धर्म स्वातंत्र्य दिले असून, धर्म चालीरिती रिवाजाप्रमाणे वागणे, आचरण करण्याबाबत अधिकार असताना केंद्र शासन भारतीय राज्य घटनेचादेखील अवमान करीत आहे, असे मत नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आले.

टॅग्स :Muslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चा