आधार लिंक करण्यासाठी महिन्याची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:13 AM2017-10-17T00:13:58+5:302017-10-17T00:15:38+5:30

रेशन दुकानदार आक्रमक : चुकीच्या कामामुळे धान्यात कपात नाशिक : रेशनकार्डावर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार क्रमांक सक्तीचे करण्यात आल्यामुळे, ज्या व्यक्तीचे आधार क्रमांक नसेल त्याला धान्य न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यासंदर्भात पुरवठा खात्याने काम दिलेल्या ठेकेदाराने चुकीचे आधार क्रमांक नोंदविणे, कुटुंबातील काही व्यक्तींची नावे गाळण्याचा प्रकार केल्यामुळे रेशन दुकानदार व पर्यायाने रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारींची दखल घेत येत्या महिन्यात नव्याने आधार लिंक करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी दिल्या आहेत.

Monthly link to support | आधार लिंक करण्यासाठी महिन्याची मुदत

आधार लिंक करण्यासाठी महिन्याची मुदत

Next

रेशन दुकानदार आक्रमक : चुकीच्या कामामुळे धान्यात कपात

नाशिक : रेशनकार्डावर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार क्रमांक सक्तीचे करण्यात आल्यामुळे, ज्या व्यक्तीचे आधार क्रमांक नसेल त्याला धान्य न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यासंदर्भात पुरवठा खात्याने काम दिलेल्या ठेकेदाराने चुकीचे आधार क्रमांक नोंदविणे, कुटुंबातील काही व्यक्तींची नावे गाळण्याचा प्रकार केल्यामुळे रेशन दुकानदार व पर्यायाने रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारींची दखल घेत येत्या महिन्यात नव्याने आधार लिंक करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी दिल्या आहेत.
रेशनकार्डावर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार क्रमांक जमा करण्याच्या सूचना पुरवठा अधिकाºयांनी दिल्या. त्यावर दुकानदारांनी सदरचे काम करणाºया ठेकेदाराच्या विरोधात तक्रारी केल्या. आजवर चार ते पाच वेळा रेशनकार्डधारकांकडून आधार गोळा करून ते ठेकेदाराला देण्यात आले, परंतु त्याला एका नोंदणीमागे चाळीस रुपये मिळणार असल्याने त्याने रेशनकार्डावर नावे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार न नोंदविता, एक-दोन व्यक्तींचे आधार जोडले. परिणामी एकाच कुटुंबातील काही व्यक्ती धान्यापासून वंचित राहत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली. तसेच आधार नोंदविण्यासाठी ठेकेदाराकडून पैसे मागितले जातात व यापूर्वी तीन ते चार वेळा दुकानदारांनी प्रती रेशनकार्ड दराने पैसे दिल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या या उपक्रमासाठी शासन ठेकेदाराला पैसे देत असताना त्याचा भुर्दंड दुकानदारांवर कशासाठी अशी विचारणा करण्यात आली तसेच यापूर्वीच्या ठेकेदाराने पूर्ण काम न करताच त्याला ठेक्याचे पैसे अदा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अखेर या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी येत्या महिनाभरात रेशन दुकानदारांना मुदत देऊन नागरिकांकडून आधार गोळा करण्याच्या सूचना दिल्या तसेच या संदर्भात ठेकेदाराला पैसे देण्याची अजिबात गरज नसल्याचे स्पष्ट केले.दिवाळीत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचनासोमवारी या संदर्भात शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने दिवाळी सणाच्या काळात रेशन दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दुकानदारांना करण्यात आल्या. शासनाने फ्री सेल घासलेटचे परवाने खुले केल्यामुळे रेशन दुकानदारांनी फ्री सेलचे घासलेट विक्री करण्यास पुढाकार घ्यावा तसेच पाच किलो वजनाचे घरगुती वापराचे गॅस सिलिंडरही देण्यात येणार असल्याने रेशन दुकानदारांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Monthly link to support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.