एक लाख प्लॅस्टिक बाटल्यांचा केला राक्षस
By Admin | Updated: March 18, 2017 23:03 IST2017-03-18T23:03:07+5:302017-03-18T23:03:33+5:30
इगतपुरी : महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या वतीने एक लाख रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून त्यांचा तब्बल वीस मीटर उंचीचा टॉवर कार्यस्थळावर उभारण्यात आला आहे.

एक लाख प्लॅस्टिक बाटल्यांचा केला राक्षस
इगतपुरी : महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या वतीने पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या पाण्याच्या एक लाख रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून त्यांचा तब्बल वीस मीटर उंचीचा टॉवर (मनोरा) इगतपुरी येथील कार्यस्थळावर उभारण्यात आला आहे. या विश्वविक्रमी या टॉवरची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे.
शुक्रवारी हा टॉवर खुला करण्यात आला. यावेळी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी ही माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अनंत कुडे, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक मधुकर प्रभावळे, इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे, शशिकांत चालिकवार, डॉ. विजयकुमार मुंडे, डॉ. संपतराव काळे, प्रा. चेतन चौधरी, गणेश देशमुख, आशिष रणदिवे, संजय शुक्ल आदि उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरणाच्या जागृतीसाठी
कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांनी संयुक्तिक
उभारलेल्या या आगळ्यावेगळ्या मनोऱ्याचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.
यावेळी उमेश जोशी व शिरीष कुलकर्णी यांनी कंपनी राबवित असलेल्या पर्यावरणाच्या विविध उपक्र मांची माहिती दिली. नासीर देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)