पावसाळापूर्व कामे संथगतीने महापालिका : तीन हजार खड्डे, ओघळ्या कायम

By Admin | Updated: May 31, 2014 00:29 IST2014-05-31T00:14:52+5:302014-05-31T00:29:38+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने सुरू झालेली पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. तीन हजार खड्डे अद्याप भरणे बाकी असून, ११५१ ओघळ्या आणि २८४० चेंबर्सची छिद्रे खुली करण्याचे काम अद्यापही बाकी असल्याचे दिसून आले आहे.

Before the monsoon, the municipal corporation: three thousand Khade, | पावसाळापूर्व कामे संथगतीने महापालिका : तीन हजार खड्डे, ओघळ्या कायम

पावसाळापूर्व कामे संथगतीने महापालिका : तीन हजार खड्डे, ओघळ्या कायम

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने सुरू झालेली पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. तीन हजार खड्डे अद्याप भरणे बाकी असून, ११५१ ओघळ्या आणि २८४० चेंबर्सची छिद्रे खुली करण्याचे काम अद्यापही बाकी असल्याचे दिसून आले आहे.
पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. म्हणजे जेमतेम आठवडाच महापालिकेच्या हातात आहे. असे असताना पावसाळापूर्व कामांना अपेक्षित गती आलेली नाही. शहरात एकूण चार हजार ३८८ खड्डे पडले होते. त्यापैकी १०६१ खड्डे बुजविण्यात आले असून, ३००७ खड्डे भरणे बाकी आहे. तसेच १७४३ ओघळ्या असून, त्यापैकी ५८१ बुजविण्यात आल्या आहेत, तर ११५१ ओघळ्या बुजविण्याचे काम बाकी आहे. शहरात आठ हजार ११३ चेंबर्स असून, त्यातील पाच हजार ३०६ चेंबर्सची छिद्रे मोकळी करण्यात आली आहेत, तर २८४० छिद्रे मोकळी करणे बाकी आहे. तसेच ११७७ कॅचपीटपैकी ८६१ कॅचपीटची छिद्रे मोकळी करण्यात आली आहेत, तर ३५५ कॅचपीटचे होल बाकी आहेत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
..इन्फो...
४०८ ठिकाणी साचणार पाणी
शहरात ४०८ ठिकाणी पावसाळी पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यात नाशिक पूर्व विभागात ३७, पश्चिम विभागात ९९, पंचवटी विभागात १०५, नाशिकरोड विभागात ५६, सिडको विभागात १११ याप्रमाणे ठिकाणे असून, सातपूरमध्ये असे एकही ठिकाण नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Before the monsoon, the municipal corporation: three thousand Khade,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.