मुद्रा कर्ज योजनेला घरघर

By Admin | Updated: January 20, 2016 22:33 IST2016-01-20T22:31:51+5:302016-01-20T22:33:03+5:30

निवेदन : बेरोजगार तरुणांचे हरिश्चंद्र चव्हाण यांना साकडे

Money laundering scheme | मुद्रा कर्ज योजनेला घरघर

मुद्रा कर्ज योजनेला घरघर

नाशिक : येथील बँक आॅफ बडोदाच्या पाटोदा शाखा व्यवस्थापकांकडून मुद्रा कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने बेरोजगार तरु णांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, बँकेने गरजू लाभार्थींना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील बेरोजगार तरु णांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
बेरोजगार गरजू तरु णांना कुठलेही तारण न ठेवता व्यवसायाकरिता सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या तीन टप्प्यातील मुद्रा कर्ज योजनेत बँक शाखाधिकाऱ्यांकडून तोंड पाहून कर्ज देण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे अनेक पात्र तरुणांवर अन्याय होऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांसाठी शासनाची ही योजना मृगजळ ठरली आहे.
शिशु, किशोर आणि तरु ण अशा तीन टप्प्यातील मुद्रा कर्ज योजनेत अनुक्रमे ५० हजार ते ५ लाख व ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्जमर्यादा ठेवण्यात आली आहे. ही कर्ज योजना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने प्रसारमाध्यमातून योजनेची जनजागृतीदेखील केली. नियमानुसार विहित नमुन्यात अर्ज भरून त्यासह व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट जोडून बँकेकडे अर्ज सादर करायचा, त्यानंतर बँक कागदपत्रांची पडताळणी करून कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे कळविण्यात आले. प्रत्यक्षात जेव्हा अनेक सुशिक्षित तरु णांनी बँकेकडे धाव घेतली, तेव्हा बँक व्यवस्थापकांनी अनेक कारणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. दुसरीकडे याचा गैरफायदा घेणारे निर्माण झाले असून, बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी ओळख असणाऱ्या मंडळींनी या योजनेवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. थातुरमातुर उद्योगाचे कोटेशन, कागदपत्र जमा करीत कर्ज उचलणे सुरू केले आहे. यामुळे खऱ्या व पात्र लाभार्थींना कर्ज मिळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. ज्या तरुणांकडे कर्ज उपलब्धतेकरिता गहाण ठेवण्याची क्षमता नाही अशा तरुणांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजनेला बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे घरघर लागली असून, इतर योजनेप्रमाणेच या योजनेचे दिवाळे निघण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासन कृषी कर्ज वाटपाबाबत आढावा घेऊन अंकुश ठेवते, त्याच पद्धतीने प्रशासनाने मुद्रा लोनबाबत बँक व्यवस्थापकांना ठरावीक उद्दिष्ट देऊन त्याचा वारंवार आढावा घ्यावा व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी मागणी येथील काही बेरोजगार तरुणांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Money laundering scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.