बोराळेच्या उपसरपंचपदी मोनाली सोळुंके बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 01:03 IST2020-12-23T22:25:27+5:302020-12-24T01:03:35+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळेच्या उपसरपंचपदी मोनाली सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मोनाली सोळुंके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

बोराळेच्या उपसरपंचपदी मोनाली सोळुंके बिनविरोध
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळेच्या उपसरपंचपदी मोनाली सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मोनाली सोळुंके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी सदस्य उज्ज्वल सोळुंके, अश्विनी देवरे, सुनंदा मोरे, अनिल जाधव, रामभाऊ मोरे, ललिता सोळुंके उपस्थित होते, तर एक सदस्य गैरहजर होता. ग्रामसेवक मिलिंद सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी नीलांबर अहिरे, पाणीपुरवठा कर्मचारी पूनम अहिरे, साफसफाई कर्मचारी शिवा साबळे उपस्थित होते. सरपंच अश्विनी पवार व उपसरपंच मोनाली सोळुंके यांचा राजेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.