जुन्या भांडणाची कुरापत काढून महिलेचा विनयभंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By नामदेव भोर | Updated: October 28, 2022 17:06 IST2022-10-28T17:05:32+5:302022-10-28T17:06:06+5:30

फिर्यादीने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत बाविस्कर आणि वानखेडे यांच्याविरोधा पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

molesting a woman over an old feud; Police registered a case in nashik | जुन्या भांडणाची कुरापत काढून महिलेचा विनयभंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

जुन्या भांडणाची कुरापत काढून महिलेचा विनयभंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नाशिक : पंचवटीतील चौघा संशयितांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीचा विनयभंग करतानाच तिच्या लहान बहिणीस लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२५) घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: संशयित अनिरुद्ध पुरुषोत्तम बाविस्कर (रा. चिंतामणीनगर, आयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, पंचवटी ) याने फिर्यादीच्या पाठीमागून पकडून विनयभंग केला. तसेच त्याच्यासह संशयित माधुरी वानखेडे, दीपिका वानखेडे, अर्चना मुरलीधर वानखेडे (रा. चिंतामणीनगर, आयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, पंचवटी )यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या बहिणीला हाताच्या चापटीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच दमदाटीही केली. त्यामुळे फिर्यादीने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत बाविस्कर आणि वानखेडे यांच्याविरोधा पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावक्न पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. सी . कासले करीत आहेत.

Web Title: molesting a woman over an old feud; Police registered a case in nashik