विनयभंगप्रकरणी संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:04 IST2018-01-08T01:03:45+5:302018-01-08T01:04:36+5:30
नाशिक : जुने नाशिकमधील भद्रकाली बागवानपुरा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग करणाºया संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

विनयभंगप्रकरणी संशयितास अटक
ठळक मुद्देसंशयिताने परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव
नाशिक : जुने नाशिकमधील भद्रकाली बागवानपुरा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग करणाºया संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पप्पू ऊर्फ विक्रम रुपचंद तासंबड (३०) या संशयिताने परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिली होती. यानुसार पोलिसांनी तपास करून संशयित पप्पू यास ताब्यात घेतले. पप्पूने मागील महिन्यात १४ तारखेला सदर पीडित मुलीसोबत अश्लील संवाद साधत तिचा बळजबरीने हात धरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.