रुग्ण महिलेचा विनयभंग; दंतचिकित्सक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:49 IST2020-05-22T21:27:50+5:302020-05-22T23:49:45+5:30
येवला : रूग्ण महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी शहरातील एका दंतचिकित्सकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रुग्ण महिलेचा विनयभंग; दंतचिकित्सक ताब्यात
येवला : रूग्ण महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी शहरातील एका दंतचिकित्सकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सप्तशृंगी मंदिरासमोरील व्यापारी संकुलातील जोशी दाताच्या दवाखान्यामध्ये ग्रामीण भागातील एक तरूण विवाहित महिला गुरु वारी (दि. २१) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तिच्या सासऱ्यासह तपासणीसाठी आली होती.
यावेळी कोरोनासाथीचे कारण सांगत डॉ. जोशी यांनी सासºयास बाहेर थांबावयास सांगून दाढेची तपासणी करताना महिलेशी
लगट केले. तसेच तिच्याकडे
लैंगिक सुखाची मागणी करीत विनयभंग केला. सदर प्रकार कुणास सांगितल्यास तुझी बदनामी करेल असा दमही दिला. मात्र, घडल्या प्रकाराने घाबरलेली महिला
तातडीने दवाखान्या बाहेर पडली.
शुक्रवारी (दि.२२), सकाळी सदर महिलेने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.
या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून, शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी डॉ. महेश जोशी यांचे विरूध्द भादंवि ३५४ अ व ५०६ अन्वये विनयभंग व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयीत आरोपी डॉ. महेश जोशी यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.