महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 15:52 IST2017-07-25T15:52:38+5:302017-07-25T15:52:38+5:30
२०१६ पासून पाठलाग ; जिवे ठार मारण्याची धमकी

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या संशयिताविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील अठरा वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा संशयित सागर संगम काळे (२५, रा़ आंबेडकर चौक, सातपूर, राजवाडा, नाशिक) हा जुलै २०१६ पासून पाठलाग करीत असे़ तसेच सोमवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास काळे याने या तरुणीसोबत तिची इच्छा नसताना बोलण्याचा प्रयत्न करून तिला पळवून नेण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ तसेच या तरुणीच्या आईलाही शिवीगाळ केली़ याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़