गरोदर महिलेस शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग
By Admin | Updated: November 22, 2014 23:58 IST2014-11-22T23:57:42+5:302014-11-22T23:58:11+5:30
गरोदर महिलेस शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग

गरोदर महिलेस शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग
देवळाली कॅम्प : कॅथे कॉलनी येथे गरोदर महिलेस शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी बारा जणांविरूद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कॅथे कॉलनी येथील अश्विनी अक्षय बर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरात एकटे असतांना जेकब विनोद पिल्ले, विनोद पिल्ले, राजू पिल्ले, संजय वैरागर, बॉबी विजु पिल्ले, छोटु मोहन नायडू, स्टेला विनोद पिल्ले, सगाई राजू पिल्ले, रूबी विजू पिल्ले, सुरेखा विजू पिल्ले, डीक्की विजू पिल्ले, रींकी विजू पिल्ले हे बळजबरीने अनाधिकृतपणे घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच अंगावरील कपडे फाडून विनयभंग करत दमदाटी केली म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)