मोहाडीचे सचिन नेहेरे यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:24 IST2020-11-19T23:46:56+5:302020-11-20T01:24:10+5:30
जानोरी : मोहाडी गट जिल्हा परिषदेच्या सदस्य सारिका नेहेरे यांचे पती व सध्या मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले सचिन बाळासाहेब नेहेरे यांना कोविड-१९च्या महामारीत मुलुंड टी विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या सेवा कार्यात दिलेले योगदान व उल्लेखनीय कार्याबद्दल मुलुंडच्या चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजभवन, मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोविडयोद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

राजभवन येथे सचिन नेहेरे यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, समवेत आमदार महीर कोटेचा, होरा.
ठळक मुद्देकोविड-१९च्या महामारीत मुलुंड टी विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या सेवा कार्यात दिलेले योगदान व उल्लेखनीय कार्याबद्दल
जानोरी : मोहाडी गट जिल्हा परिषदेच्या सदस्य सारिका नेहेरे यांचे पती व सध्या मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले सचिन बाळासाहेब नेहेरे यांना कोविड-१९च्या महामारीत मुलुंड टी विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या सेवा कार्यात दिलेले योगदान व उल्लेखनीय कार्याबद्दल मुलुंडच्या चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजभवन, मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोविडयोद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुलुंडचे आमदार महीर कोटेचा, सामाजिक कार्यकर्ते होरा आदी उपस्थित होते.