क्यांवर रंगल्या मोदींच्या चर्चा
By Admin | Updated: May 17, 2014 00:10 IST2014-05-17T00:04:57+5:302014-05-17T00:10:08+5:30
नाशिक : लोकसभा मतदानानंतर सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा होती़ नाशिक, दिंडोरीसह देशभर भाजपाने मारलेल्या मुसंडीची चर्चा शहरातील गल्लोगल्ली तसेच क्याक्यांवर रंगल्याचे आज चित्र होते़

क्यांवर रंगल्या मोदींच्या चर्चा
नाशिक : लोकसभा मतदानानंतर सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा होती़ नाशिक, दिंडोरीसह देशभर भाजपाने मारलेल्या मुसंडीची चर्चा शहरातील गल्लोगल्ली तसेच क्याक्यांवर रंगल्याचे आज चित्र होते़
निवडणूक निकालानंतर प्रामुख्याने जिल्ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पराभव व देशभरात मोदी लाटेने कॉँग्रेस आघाडीची केलेली उलथापालथ यावर शहरातील प्रत्येक गल्लीबोळात चर्चा चालू होत्या़ शहरातील चहाच्या टपर्या, हॉटेल्स, लस्सी सेंटर, ज्यूस सेंटर, स्वीट होम अशा सर्वच ठिकाणी केवळ आजचे निवडणूक निकाल व मोदी लाटेचीच चर्चा होती़
देशात वाढत असलेली महागाई, आघाडीतील वाढते भ्रष्टाचार, इंधन दरवाढ, वाढती बेकारी यामुळे सरकारविरोधात असलेला रोष देशातील जनतेने या मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे, तर मोदींच्या रूपाने लाभलेल्या उत्कृष्ट पर्यायामुळे हा बदल झाल्याची चर्चा सर्वाधिक झडत होती़