टोळक्याचा चाकूहल्ला अन् सोनसाखळी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:15+5:302021-02-05T05:38:15+5:30
याप्रकरणी ऋषिकेश वसंत बोडके (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गौरव देशमुख (पूर्ण नाव व पत्ता ...

टोळक्याचा चाकूहल्ला अन् सोनसाखळी लांबविली
याप्रकरणी ऋषिकेश वसंत बोडके (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गौरव देशमुख (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेशचा मित्र सागर शेळके यांच्याकडे काही कर्जाचे हप्ते बाकी होते. ते मागण्यासाठी संशयित गौरव त्यांच्याकडे गेला असता त्यांच्यात शिवीगाळ झाली. त्यामुळे फिर्यादी ऋषिकेशने मध्यस्थी करत समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने संशयित गौरव हा त्यांच्या पाच साथीदारांसह ऋषिकेश राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आला व त्यास शिवीगाळ केली. यावेळी एका संशयिताने धारदार चॉपरने ऋषिकेशच्या डोक्यावर वार केले. तसेच बाजूला पडलेल्या फरशीचे तुकडे व विटांनी त्यास मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.