मोबाइल टोळीकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:11 IST2018-06-27T23:10:39+5:302018-06-27T23:11:07+5:30
नाशिक : मोबाइल पळविणाऱ्या टोळीच्या सातपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून मोबाइलसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल टोळीकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त
नाशिक : मोबाइल पळविणाऱ्या टोळीच्या सातपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून मोबाइलसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट सर्कल व्हिक्टर कंपनीजवळ सोमवारी (दि. १८) सायंकाळी कामावरून घरी जाणाºया युवराज विष्णू अंबापुरे या कामगाराचा मोबाइल मोपेडवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेला होता. अंबापुरे यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित योगेश ऊर्फ बंटी बळवंत पाटील, विशाल पोपट सांगळे, महेश अशोक कोतूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या संशयितांकडून अॅक्टिवा मोटरसायकल आणि सहा मोबाइल, असा एक लाख चार हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.