मोबाइलवर बोलत जाणार्‍याचा मोबाइल लंपास

By Admin | Updated: May 29, 2014 00:44 IST2014-05-29T00:21:27+5:302014-05-29T00:44:02+5:30

नाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणार्‍या इसमाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूर रोडवरील क्रिसेट अपार्टमेंटमध्ये राहणारे मनोहर धोंडू लोहार (४४) हे मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास रस्त्याने मोबाइवर बोलत चालले होते़ या दरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा २१ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला़ या प्रकरणी लोहार यांच्या फि र्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Mobile Lampas Talking on Mobile | मोबाइलवर बोलत जाणार्‍याचा मोबाइल लंपास

मोबाइलवर बोलत जाणार्‍याचा मोबाइल लंपास

नाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणार्‍या इसमाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूर रोडवरील क्रिसेट अपार्टमेंटमध्ये राहणारे मनोहर धोंडू लोहार (४४) हे मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास रस्त्याने मोबाइवर बोलत चालले होते़ या दरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा २१ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला़ या प्रकरणी लोहार यांच्या फि र्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Mobile Lampas Talking on Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.