साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांकडून मोबाइल जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:54+5:302021-09-02T04:30:54+5:30
चौकट==== ऑफलाइन माहितीचा ताण अंगणवाडी सेविकांना गरोदर, स्तनदा माता, कुपोषित बालके आदींची माहिती अकरा प्रकारच्या रजिस्टरमध्ये भरावी लागते. हीच ...

साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांकडून मोबाइल जमा
चौकट====
ऑफलाइन माहितीचा ताण
अंगणवाडी सेविकांना गरोदर, स्तनदा माता, कुपोषित बालके आदींची माहिती अकरा प्रकारच्या रजिस्टरमध्ये भरावी लागते. हीच माहिती मोबाइल ॲपमध्येही भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. मोबाइल जमा केल्यामुळे आता पुन्हा त्यांना ऑफलाइन माहिती भरावी लागत असून, दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून ही माहिती आता रजिस्टरमध्ये भरावी लागत असल्याने अतिरिक्त ताण पडत आहे.
चौकट===
पोहोच देण्यास नकार
तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविकांकडून मोबाइल जमा केले जात असताना सदरचे मोबाइल मिळाल्याची पोहोच देण्यास मात्र बालविकास प्रकल्प अधिकारी नकार देत आहेत. त्यामुळे जमा केलेल्या मोबाइलचे फोटो पुराव्यासाठी अंगणवाडी सेविका काढत आहेत. मुळात मोबाइल शासनाचे असल्याने ते घरी नेण्याची परवानगी अंगणवाडी सेविकांना नाही. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनी ते जमा करून घ्यावेत, असा त्यांचा आग्रह आहे.