शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

जमावाची बसेसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:01 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर दगडफेक केली.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शिरवाडे वणी फाट्यानजीक अपघातात दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर दगडफेक केली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवाडे वणी येथील संजय भिका डंबाळे हे आपल्या बजाज डिस्कव्हर दुचाकीने (एमएच १५ ईडी ६४८१) शिरवाडेकडून वडनेरभैरवकडे महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी वडाळीभोईच्या दिशेने भरधाव जाणाºया मालेगाव आगाराच्या बसने (क्र. एमएच २९, बीएल ४२२०) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार संजय भिका डंबाळे यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांना तातडीने पिंपळगाव प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांनी मृत घोषित करत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाच्या फिर्यादीवरून बसचालक प्रवीण श्यामरावकचवे यांच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हादाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत.जमाव संतप्तअपघातानंतर बसचालकाने बस सोडून दुसºया बसने पलायन केले. संतप्त जमावाने महामार्गावर येणाºया प्रत्येक बसला अडविले. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेल्या बसव्यतिरिक्त महामार्गावर असलेल्या बसवर जमावाने दगडफेक केल्याने त्या मालेगाव आगाराच्या बसव्यतिरिक्त नांदगाव व मनमाड आगाराच्या बसचेदेखील नुकसान झाले आहे.मृत व्यक्ती शिरवाडे वणी येथील असल्याने संतप्त जमावाने अपघातानंतर महामार्गावर येणाºया प्रत्येक बस अडविली. तब्बल वीस बसेस जमावाने रोखून धरल्या होत्या. त्यात तीन बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या; परंतु घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमावाला शांत केल्यामुळे महामार्गावर अन्य बसेसचे होणारे नुकसान टळले.शिरवाडे वणी फाटा मृत्यूचा सापळाशिरवाडे फाट्याजवळ गेल्यापाच वर्षांचा आकडा बघितला तर अपघात होऊन याठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.वेळोवेळी याठिकाणी पुलाची मागणी करूनदेखील योग्य तो निर्णय घेतला जात नसल्याने नागरिकांनी होत असलेल्या अपघातांमुळे नाराजी व्यक्त केलीआहे.

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळTravel Tipsट्रॅव्हल टिप्स