विद्यार्थ्यांना दाखले त्वरीत मिळण्यासाठी मनसेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:57 PM2019-06-26T17:57:33+5:302019-06-26T17:57:45+5:30

सिन्नर : सेतू कार्यालयातून दाखले देण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नायब तहसीलदार दिलीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MNS's plea for getting students to get the certificates quickly | विद्यार्थ्यांना दाखले त्वरीत मिळण्यासाठी मनसेचे निवेदन

विद्यार्थ्यांना दाखले त्वरीत मिळण्यासाठी मनसेचे निवेदन

googlenewsNext

सिन्नर : सेतू कार्यालयातून दाखले देण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नायब तहसीलदार दिलीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी दाखले सेतू कार्यालयातून द्यावे लागतात. महाविद्यालयाच्या प्रक्रिया सुरू झाल्या असून अर्ज भरावयाची अंतिम तारीख नियोजित झाली असल्याने विद्यार्थ्यांना दाखले त्वरित मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी संघटक तुषार कपोते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्नील आव्हाड, सागर बेनके, निखिल लहामगे, श्रीकांत पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: MNS's plea for getting students to get the certificates quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.