नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीनाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केली होती. 26 एप्रिल रोज नाशिक येथील सभेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी (खोडाला) या गावातील दुष्काळाचे वास्तव दाखवले. त्या गावातील दुष्काळ निवारणासाठी मनसे पुढे सरसावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार या गावाला पाण्याचे टाक्या आणि टँकर पुरविण्यात येत आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनापासून या कामाला सुरुवात झाली आहे.
बर्डेवाडी (खोडाला) गावातील महिला ज्याप्रमाणे पाण्यासाठी वणवण फिरतायंत. जीव धोक्यात घालून विहिरीतून हंडाभर पाणी काढत असतानचे व्हिडीओ राज यांनी आपल्या सभेत दाखवले होते. या गावातील दुष्काळ दाखवत राज यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली. मात्र, राज केवळ टीका करुन थांबले नाहीत. तर, भाजपाकडून होणाऱ्या टीकेलाही मनसेनं सणसणीत उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये एकतरी झाड लावलं का? असा प्रश्न मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विचारला होता.