शिंदे टोलनाक्यावर मनसेचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST2021-03-13T04:25:59+5:302021-03-13T04:25:59+5:30
तालुकाध्यक्ष सुनील गायधनी यांनी सिन्नर टोलवेज कंपनीचे व्यवस्थापक यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, नाशिक सिन्नर कंपनीकडून ...

शिंदे टोलनाक्यावर मनसेचा आंदोलनाचा इशारा
तालुकाध्यक्ष सुनील गायधनी यांनी सिन्नर टोलवेज कंपनीचे व्यवस्थापक यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, नाशिक सिन्नर कंपनीकडून शिंदे-पळसे या सर्व्हिस रोडवर पथदीप बसविलेले नसून अनेक कामे अपूर्ण आहेत. बंगाली बाबा पुलावर बसवलेले पथदीप चार महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या चोऱ्या होत असल्याचे अनेकदा टोलवेज व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देऊन देखील आजपर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही. पळसे येथील झेब्रा क्रॉसिंगजवळ बसवलेला हायमास्ट आठ महिन्यांपासून बंद आहे. सिग्नलदेखील बंद असल्याने वाहनधारकांना रात्री झेब्रा क्रॉसिंग लक्षात येत नसल्याने अपघात होतात. सर्व्हिस रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याची डागडुजी आदी अनेक कामे अपूर्ण आहेत. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर उमेश गायधनी, गणेश घनदाट, ईश्वर गायखे, विशाल गायधनी, कृष्णा जाधव आदींच्या सह्या आहेत. (फोटो ११ मनसे)