बॉटनीकल उद्यानाची मनसेला आली आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:13+5:302021-07-24T04:11:13+5:30

गत पंचवार्षिक काळात मनसेने उभारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांची अवस्था सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीमुळे दयनीय झाली असून, मनपावर बोजा पडू न देता, ...

MNS remembered the botanical garden | बॉटनीकल उद्यानाची मनसेला आली आठवण

बॉटनीकल उद्यानाची मनसेला आली आठवण

गत पंचवार्षिक काळात मनसेने उभारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांची अवस्था सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीमुळे दयनीय झाली असून, मनपावर बोजा पडू न देता, विविध कंपनी सीएसआर निधीतून नाशिकच्या सौंदर्यात वाढ होईल, असे प्रकल्प मनसेने उभारले. मात्र, बॉटनीकल उद्यानाची अवस्था दुर्लक्षामुळे बिकट झाली आहे. पांडवलेणी पायथ्याशी साकारलेले उद्यान टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. लेझर लायटिंगयुक्त झाडे, फुलपाखरू प्रवेशद्वार, खेळण्याची दुरवस्था झाली आहे. बंद पडलेला बोलकी झाडे शो, तुटलेली खेळणी, अश्लील चाळे, युवकांकडून मादक पदार्थांचे सेवन, महिला-मुलींची छेडछाड घटनांमुळे स्थळ बदनाम झाले आहे. टवाळखोरांकडून सुरक्षारक्षकांना दमदाटी केली जाते. यापूर्वी मनसेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने लक्ष न दिल्याने, मुख्य वनसंरक्षकांनी आता लक्ष देत गरज पडल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सक्षम सुरक्षारक्षक नेमावे. पर्यटनाला चालना देणाऱ्या उद्यानाची सुधारणा करण्यास संबंधितांना निर्देश द्यावे, अन्यथा मनसे आंदोलन छेडेल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, सत्यम खंडाळे, योगेश लभडे, संदेश जगताप, संजय देवरे, अमित गांगुर्डे, सिद्धेश सानप आदी उपस्थित होते.

Web Title: MNS remembered the botanical garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.