शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पदाधिकाऱ्याने पक्षातील महिलेला पाठवले अश्लील मेसेज; राज ठाकरेंपर्यंत विषय पोहोचला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 11:43 IST

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका आघाडीचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी एका महिलेस रात्री-अपरात्री मेसेज केले हेाते.

नाशिक: एकीकडे मनसेप्रमुखराज ठाकरे हे पक्षसंघटनेला मजबूत करण्यासाठी वेळ देत असतानाच दुसरीकडे मात्र पक्षातील एका पदाधिकाऱ्याने महिला पदाधिकाऱ्याला रात्री-अपरात्री अश्लील मेसेज पाठवले. त्यामुळे या महिलेसह अन्य महिलांनी रविवारी (दि. २१) त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर राज ठाकरे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते. राज ठाकरे हे तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर होते. दोन दिवस त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रविवारी (दि. २१) ते एक्स्प्रेस ईन हॉटेलमध्येच क्रेडाई आणि शेतकरी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा करत असताना हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. 

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका आघाडीचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी एका महिलेस रात्री-अपरात्री मेसेज केले हेाते. त्यामुळे महिला आघाडीच्या महिला नाराज होत्याच; मात्र, त्यानंतरदेखील हा पदाधिकारी त्या ठिकाणी राज यांना भेटण्यासाठी आला होत; त्यामुळे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारून मग चांगलाच चोप दिल्याचे वृत्त आहे. अन्य काही पदाधिकाऱ्यांनी सारवासारव केल्यानंतर हा विषय राज ठाकरे यांच्याकडे गेला. त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक आणि जिल्हाध्यक्ष अंकुश ठाकरे यांना तातडीने या विषयाची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.

संबंधित पदाधिकाऱ्याविषयी यापूर्वीदेखील तक्रारी झाल्यानंतर त्याचे पद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुन्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्याने महिला पदाधिकाऱ्याला मेसेज केल्याने अन्य महिला संतप्त झाल्या होत्या. राज नाशिकमध्ये असतानाच त्यांनी या पदाधिकाऱ्याला धडा शिकवल्याचे समजते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNashikनाशिक