शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मनसे आघाडी पुरस्कृत सभापतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 22:05 IST

हालचाली : सिडको प्रभाग समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

 सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले असून, यंदाच्या वर्षी कोणत्या पक्षाचा सभापती होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडी पुरस्कृत महापौर असल्याने हाच फॉर्म्युला प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत वापरण्याची शक्यता दिसून येत आहे. असे झाल्यास शिवसेनेचे अधिक नगरसेवक असतानाही त्यांचा सभापती होणे अवघड असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सध्या सिडको प्रभाग सभापतिपदी मनसेच्या नगरसेवक कांचन पाटील या आहेत. त्यांचा कार्यकाळ या महिनाअखेरपर्यंत आहे. यामुळे सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिडको प्रभागात एकूण २२ नगरसेवक आहे. यात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, उत्तम दोंदे, अ‍ॅड. अरविंद शेळके, डी. जी. सूर्यवंशी, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, शोभा निकम, शोभा फडोळ असे नऊ नगरसेवक आहेत. सेनेपाठोपाठ मनसेचे अनिल मटाले, सुदाम कोंबडे, शीतल भामरे, कांचन पाटील, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे असे सहा नगरसेवक आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजी चुंभळे, राजेंद्र महाले, कल्पना चुंभळे असे तीन तर कॉँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, अश्विनी बोरस्ते मिळून दोन यांचा तर भाजपाकडून डॉ. अपूर्व हिरे, माकपाकडून अ‍ॅड. तानाजी जायभावे असे पक्षीय बलाबल आहे. मनसेचे नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने सिडको प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक झाल्याने त्यांचे पक्षीय बलाबल वाढलेले आहे. निवडणुकीत सरळसरळ लढत झाल्यास संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा सभापती होऊ शकतो. परंतु नाशिक महापालिकेत मनसेचा महापौर हा मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व अपक्ष आघाडीचा मिळून झाला असून, मागील वर्षी सिडको प्रभाग सभापतीच्या निवडणुकीतही अशीच आघाडी करण्यात आली होती. असाच फॉर्म्युला यंदाच्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत झाल्यास पुन्हा मनसे आघाडी पुरस्कृत सभापती होण्याची शक्यात दिसत आहे. (वार्ताहर)