अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:47 IST2021-01-28T22:02:38+5:302021-01-29T00:47:36+5:30

लासलगाव : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लासलगाव शहर यांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या उपोषणाची बुधवारी सांगता करण्यात आली.

MNS goes on hunger strike after assurances from officials | अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ठळक मुद्देमहावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वासन

लासलगाव : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लासलगाव शहर यांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या उपोषणाची बुधवारी सांगता करण्यात आली.                 

                   महावितरण कार्यालयाला याबाबतचे निवेदन देऊन नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल रिडिंगप्रमाणे कमी करून मिळेल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वासन घेऊन हे उपोषण मागे घेतले.

             यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतन कुमार इचम, अनंता सूर्यवंशी, बालेश जाधव, आशुतोष सूर्यवंशी, ऋषिकेश झांबरे, अमित गंभीरे, सूरज पवार, सुमित गीते, धनंजय गायकवाड, फैज शेख, योगेश निकम, संकेत सूर्यवंशी, सदाशिव शिंदे, मनसे कार्यकर्ते व वीज बिल ग्राहक उपस्थित होते.   

Web Title: MNS goes on hunger strike after assurances from officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.