राज्यातील सहकार व्यवस्थेवर मनसेची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:50+5:302021-09-25T04:14:50+5:30

नाशिकरोड : सहकार क्षेत्रात महाराष्ट्र एकेकाळी अव्वल होता. आता सहकार संपण्याच्या मार्गावर असून राजकीय नेत्यांनी स्वतःची ...

MNS criticizes the co-operative system in the state | राज्यातील सहकार व्यवस्थेवर मनसेची टीका

राज्यातील सहकार व्यवस्थेवर मनसेची टीका

नाशिकरोड : सहकार क्षेत्रात महाराष्ट्र एकेकाळी अव्वल होता. आता सहकार संपण्याच्या मार्गावर असून राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजून जनतेला कुपोषित ठेवले आहे. महाराष्ट्र सहकार सेना सहकाराची स्वच्छता करून एक नवे पर्व सुरू करणार असल्याचे प्रतिपादन मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी केले. मोटवानीरोड उत्सव मंगल कार्यालयात मनसे सहकार सेनेची शुक्रवारी सहकाराच्या समस्यांबाबत बैठक झाली. व्यासपीठावर मनसेचे सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, माजी गटनेते सलीम शेख, रोहन देशपांडे, अंकुश पवार, कामगार सेनेचे बंटी कोरडे, उपजिल्हाध्यक्ष संतोष शहाणे, सरचिटणीस संतोष पिल्ले, सचिन भोसले, राजेंद्र काळे, प्रियंका शृंगारे, कौस्तुभ लिमये, पद्मिनी वारे, विक्रम कदम, बंटी लभडे, सत्यम खंडाळे, नितीन साळवे, शाम गोहाड, कौशल पाटील, सौरभ सोनवणे, साहेबराव खर्जुल, प्रमोद साखरे आदी उपस्थित होते.

यावेळी धोत्रे म्हणाले, सहकाराची स्थिती फार बिकट असून बाजार समित्या, साखर कारखाने, सहकारी बँका, दूध संघ, शेतकरी हवालदिल झाले आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक म्हणाले, की मनसेची महापालिकेत सत्ता असताना भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. शहरात लवकरच ‘शाखा अध्यक्ष तुमच्या भेटीला’ हे अभियान सुरू करत असल्याचे माजी मनपा गटनेते सलीम शेख यांनी सांगितले. स्वागत मनसे सहकार सेनेचे रोहन देशपांडे यांनी केले. विजय जाधव यांनी महाराष्ट्र सहकार सेनेची शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल साळवे यांनी आभार मानले. भाऊसाहेब निमसे, राकेश परदेशी, अक्षरा घोडके, गौरव शिंपी आदींनी संयोजन केले.

240921\24nsk_39_24092021_13.jpg

मनसे सहकार सेना मेळाव्यात बोलतांना दिलीप धोत्रे. व्यासपीठावर मान्यवर

Web Title: MNS criticizes the co-operative system in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.