मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा मैदानात; उद्यापासून तीन दिवस नाशकात मुक्काम

By Suyog.joshi | Updated: January 21, 2025 20:37 IST2025-01-21T20:37:35+5:302025-01-21T20:37:50+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्या (दि. २३) पासून पुन्हा एकदा मैदानात उतरत असून नाशिक ...

MNS chief Raj Thackeray back in the fray; to stay in Nashik for three days from tomorrow | मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा मैदानात; उद्यापासून तीन दिवस नाशकात मुक्काम

मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा मैदानात; उद्यापासून तीन दिवस नाशकात मुक्काम

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्या (दि. २३) पासून पुन्हा एकदा मैदानात उतरत असून नाशिक येथे तीन दिवस मुक्कामी राहणार आहेत. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दौऱ्याचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसला तरी ते पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे. या शिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देखील करणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी व आगामी मनपासह, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी तब्बल ४० नगरसेवक निवडून दिले होते. त्यामुळे २०१२ ते २०१७ या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, ट्राफिक चिल्ड्रन पार्क, गोदा पार्क, रिंग रोड आदी महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले होते. शहराचे सुशोभीकरणावर त्यांनी विशेष लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या खाली देखील सुशोभीकरण करून घेतले. याच विकास कामांच्या जोरावर २०१७ ची महापालिका निवडणूक आपण पुन्हा जिंकू असे वाटत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. याच काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडले. त्यामुळे राज ठाकरे अंतर्गत गटबाजी संपवणार का याकडे मनसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: MNS chief Raj Thackeray back in the fray; to stay in Nashik for three days from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.