आमदार कोकाटे : कणकोरी ग्रामस्थांचा वृक्षलागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST2021-07-23T04:10:51+5:302021-07-23T04:10:51+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ...

आमदार कोकाटे : कणकोरी ग्रामस्थांचा वृक्षलागवडीचा संकल्प
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी २१० रोपट्यांचे रोपण व संवर्धन करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी सोडला. दिलीप माळवे व माजी सदस्य शिवाजी बुचकुल यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, संदीप शेळके, सरपंच योगिता सांगळे, उपसरपंच अण्णासाहेब बुचकुल, माजी सरपंच रामनाथ सांगळे, गणेश सांगळे, शिवाजी माळवे, ज्योती सांगळे, सुरेश थोरात, नानासाहेब बुचकुल, गणेश बुचकुल, नवनाथ बुचकुल, ज्ञानेश्वर बुचकुल, रोहिदास जगताप, गणेश माळवे, संजय सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------
कणकोरी येथे वृक्षारोपण करताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत संदीप शेळके, अण्णासाहेब बुचकुल, रामनाथ सांगळे, शिवाजी बुचकुल, दिलीप माळवे, गणेश सांगळे आदी. (२२ कणकोरी)
220721\22nsk_17_22072021_13.jpg
२२ कणकोरी