लोहोणेरला उद्यापासून आमदार चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:08 IST2018-03-09T00:08:30+5:302018-03-09T00:08:30+5:30
लोहोणेर : लोहोणेर गावात १० मार्चपासून आमदार चषक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण अलई यांनी दिली आहे.

लोहोणेरला उद्यापासून आमदार चषक
लोहोणेर : देवळा तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या लोहोणेर गावात १० मार्चपासून आमदार चषक २०१८ चे आयोजन क्र ाइम प्रिव्हेन्शन कौन्सिल Ÿ इन्वेस्टिगेशन व ओम बजरंग ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण अलई यांनी दिली आहे.
आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम विजयी संघास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे, तर द्वितीय संघास ५५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अहेर यांच्या हस्ते करण्यात येणार असून, अध्यक्षस्थानी लोहोणेरच्या सरपंच जयवंता बच्छाव असतील. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, धनश्री अहेर, सिद्धार्थ भंडारे आदी उपस्थित राहणार आहेत.