शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:20 IST

मागील पाच वर्षांत शहरात ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघाती मृतांमध्ये ४६७ दुचाकीस्वार असून त्यापैकी ...

मागील पाच वर्षांत शहरात ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघाती मृतांमध्ये ४६७ दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी याबाबत पेट्रोलपंप चालक, वितरकांची एकत्रित बैठक घेत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या संकल्पनेतून शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटबाबत गांभीर्य निर्माण व्हावे आणि रस्ता सुरक्षा जोपासली जावी, हा यामागील उद्देश आहे.

भुजबळ यांच्या हस्ते गंगापूर रोडवरील सदभावना पोलीस पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले-श्रींगी आदी उपस्थित होते.

या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २ हजार ५३ हेल्मेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हेल्मेट न वापरल्याने रस्ते अपघातात आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचे गमावलेल्या दोघा नागरिकांनी त्यांच्या भावना मांडल्या. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले अन‌् त्यांनीही पोटतिडकीने नाशिककरांना हेल्मेट वापरण्याबाबत अधिकाधिक जागरूकता दाखविण्याचे आवाहन केले.

--इन्फो---

‘सद‌्भावना’ कठोर तर कामटे पंपावर निष्काळजी

गंगापूर रोडवरील दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सद‌भावना पेट्रोलपंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’बाबत अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत होती; मात्र शरणपूर रोडवरील पोलिसांकडून चालविण्यास देण्यात आलेल्या शहीद अशोक कामटे पोलीस पेट्रोल पंपावर याबाबत काहीशी निष्काळजीही बघावयास मिळाली. विनाहेल्मेट आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल दिले गेले, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे नमुना अर्जसुद्धा भरून घेण्यात आले नाहीत असे प्रकार शहरातील उपनगरीय भागातील पेट्रोलपंपावरही बघावयास मिळाले.

170821\17nsk_20_17082021_13.jpg

हेल्मेट आवश्यक