पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेपत्ता मुली सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:45 PM2020-03-02T23:45:51+5:302020-03-02T23:48:26+5:30

त्र्यंबकेश्वर : आईवडील रागावल्याचा राग आल्याने तोरंगण (त्र्यंबक) येथील तीन मुली घर सोडून गेल्या होत्या. याबाबत पालकांनी त्र्यंबक पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या मुलींना नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

Missing girls happy with police incident | पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेपत्ता मुली सुखरूप

पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेपत्ता मुली सुखरूप

Next
ठळक मुद्देआमचे पालक रागावल्याचा राग आला म्हणून त्या घरातून आलो.

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : आईवडील रागावल्याचा राग आल्याने तोरंगण (त्र्यंबक) येथील तीन मुली घर सोडून गेल्या होत्या. याबाबत पालकांनी त्र्यंबक पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या मुलींना नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. २८) तोरंगण (त्र्यं.) येथील तीन मुली अचानक गायब झाल्या होत्या. याबाबत पालकांनी रात्री १० वाजता त्र्यंबक पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून नाशिक येथेच मुलींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मुलींनी सांगितले की, आमचे पालक रागावल्याचा राग आला म्हणून त्या घरातून आलो.

Web Title: Missing girls happy with police incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.