शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

‘मिसळ’ची सरमिसळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:57 AM

राजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्या गेल्या असल्या तरी, राजकारणातील अभिनिवेश सुटता सुटत नाहीत. संबंधितांचे वर्तनच तसे घडून येताना दिसते. नाशकातील खासगी ‘मिसळ’ पार्टीची चर्चाचर्वण होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.

ठळक मुद्देनव्या उद्योगाच्या शुभारंभाचे निमित्त सारे सहकारी यानिमित्ताने एकवटले‘चिंतकां’ची सद्दी संपलेली नाही

साराशकिरण अग्रवालराजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्या गेल्या असल्या तरी, राजकारणातील अभिनिवेश सुटता सुटत नाहीत. संबंधितांचे वर्तनच तसे घडून येताना दिसते. नाशकातील खासगी ‘मिसळ’ पार्टीची चर्चाचर्वण होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.शिवसेनेतून भाजपा व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून आलेल्या सुनील बागुल यांनी आपल्या मूळ पक्षातील तत्कालीन सवंगड्यांना दिलेल्या मिसळ पार्टीला खरे तर दिंडोरीतील त्यांच्या एका नव्या उद्योगाच्या शुभारंभाचे निमित्त होते, पण त्याखेरीजचे संदर्भ लावून ही पार्टी वेगवेगळ्या शक्यतांना जन्म घालणारी ठरली. कारण, एरव्ही एकमेकांना न भेटणारे मूळ राजकीय प्रवाहाबाहेरचे सारे सहकारी यानिमित्ताने एकवटले होते. यात शिवसेनेबाहेर पडून सध्या दुसºया पक्षात असलेले जसे होते तसेच शिवसेनेत कायम असलेलेही होते. फरक इतकाच की ते विद्यमान पक्षाधारींबरोबर जमवून न घेऊ शकलेले व परिणामी पक्षात राहूनही जणू अडगळीत पडलेलेच आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पक्ष नेतृत्वाबद्दलच्या चर्चेचा तडका या मिसळ पार्टीत लाभून गेला. अर्थात, शिवसेनेत अडगळीत पडल्याची व्यथा मनी बाळगणाºयांबरोबरच अन्य पक्षात जाऊनही अडगळीत पडून असलेलेच या निमित्ताने एकत्र आलेले दिसून आले, त्यामुळेही या तडक्याचा खमंगपणा लक्षवेधी ठरून गेला म्हणायचे. बागुल भाजपात भलेही प्रदेश उपाध्यक्षपदी आहेत, पण अनेक उपाध्यक्षांच्या गर्दीत त्यांना तेथे अपेक्षित सन्मान लाभणे शक्य नाही. शिवाय भाजपाचे संस्कार पचविणे हे तितकेसे सहज नक्कीच नाही. अलीकडच्या काळात भाजपाचेही काँग्रेसीकरण होत चालले आहे हा भाग वेगळा, परंतु तेथील ‘चिंतकां’ची यासंदर्भातील सद्दी अजून संपलेली नाही. परिणामी पर पक्षातून आलेल्या बागुल यांच्याकडे तसे त्रयस्थतेनेच पाहिले जाते. शिवसेनेत टिकून असलेले दत्ता गायकवाड, जयंत दिंडे यांची अवस्थाही वेगळी नाही. एकेकाळी पक्षासाठी खस्ता खाल्लेले हे नेते आज स्वपक्षात दुर्लक्षिले गेले आहेत. विनायक पांडे स्वभावत: शिवसैनिक असले तरी मध्यंतरीच्या काळात त्यांनीही धरसोडीचे राजकारण केले, त्यामुळे तेही बाजूला पडल्यासारखे आहेत. अशा पार्श्वभूमीवर या साºयांची मांदियाळी जमून आल्यानेच ती चर्चेत ठरली. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी त्यास असेलही, परंतु या साºयांचे अराजकीय मैत्र हा कौतुकाचा विषय न ठरता त्यांच्या एकत्रिकरणातून निरनिराळे अर्थ काढले जातात तेव्हा संबंधितांची व त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दलची विश्वासार्हताही पणास लागते आणि तोच यातील खरा मुद्दा आहे. कारण मिसळ पार्टीच्या निमित्ताने राजकीय सरमिसळ झालेल्यांची ‘मन की बात’ वेगळीच असली आणि पूर्वीचे दिन आता राहिले नाहीत, असाच त्यामागील समान धागा राहिल्याचे पाहता, त्यातून तसाच अर्थ प्रसृत होणे व विश्वसार्हतेचीही चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरते.