समाजकंटकांनी चार-पाच दुचाकी पाडून त्यांचे नुकसान

By Admin | Updated: November 23, 2014 00:22 IST2014-11-23T00:22:16+5:302014-11-23T00:22:40+5:30

समाजकंटकांनी चार-पाच दुचाकी पाडून त्यांचे नुकसान

The miscreants damaged four to five bikes and damaged them | समाजकंटकांनी चार-पाच दुचाकी पाडून त्यांचे नुकसान

समाजकंटकांनी चार-पाच दुचाकी पाडून त्यांचे नुकसान

नाशिक : पंचवटीतील नागचौकात अज्ञात समाजकंटकांनी चार-पाच दुचाकी पाडून त्यांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे़ मात्र, याबाबत केवळ एकानेच पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील नागचौकातील स्वामीनारायण निवासमध्ये राहणारे रमेश नारायण जाधव यांची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (एमएच १५, सीआर ५१५०) बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे लावलेली होती़ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या दुचाकीसोबत लावलेल्या तीन-चार दुचाकी पाडून त्यांचे नुकसान केले़ जाधव यांच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीवर तर ओरखडे ओढून आरसाही फोडण्यात आला होता़ या प्रकरणी त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अधिक तपास काट्या मारुती पोलीस चौकीतील हेड कॉन्स्टेबल गांगोडे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: The miscreants damaged four to five bikes and damaged them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.