शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: अल्पवयिनांनी चाकूचा धाक दाखवून लुटला मोबाईल, पोलिसांनी तासाभरातच आवळल्या संशयितांच्या मुसक्या

By नामदेव भोर | Updated: July 18, 2023 14:00 IST

Nashik Crime News: फाळके स्मारकलगत असलेल्या समांतर रस्त्यावर काही अल्पवयीन टवाळखोरांनी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली

- संजय शहाणे इंदिरानगर /नाशिक  - फाळके स्मारकलगत असलेल्या समांतर रस्त्यावर काही अल्पवयीन टवाळखोरांनी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या तासाभरातच संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी लुटलेला मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला. मात्र या प्रकरणातील सर्व संशयित हे अल्पवयीन असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कुमार बरसाती कश्यप (२४, रा. कंपनीच्या कामगार रूम, अंबड, मूळ- नवाबमन उत्तर प्रदेश) हा व त्याचा काका बाबूलाल कश्यप सोमवारी (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजता नाश्ता करण्यासाठी फाळके स्मारकच्या बाजूला असलेल्या समांतर रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी समोरून १७ ते १८ वयोगटातील दोन मुले त्यांच्याजवळ आले. त्यांनी बाबुलाल कश्यप यांना चाकू दाखवून पैशे आणि मोबाईलची मागणी करीत शिवीगाळ केली.त्यामुळे घाबरून गेलेल्या अर्जुनकुमार यांने खिशातील सुमारे दहा हजार रुपयांचा मोबाईल त्यांना दिला. त्यानंतर दोघा संशयितांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे कश्यप घाबरून घरी निघून आले. त्यांनी घडलेला प्रकार भावाला सांगितला. त्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षण नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक शंकर सिंह राजपूत, प्रभाकर पवार, सौरभ माळी, विशाल पाठक यांनी पांडवलेण्याच्या पायथ्याच्या परिसरातच सापळा रचून दोन्ही अल्पवयिन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत केला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक