अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:57 IST2018-07-14T00:57:29+5:302018-07-14T00:57:50+5:30
सिडको : अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ भावेश ऊर्फ उदयलाल नानालाल तेली (२३, रा. पिंपळगाव बसवंत, मूळ रा. भिलवाड, राजस्थान) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार
सिडको : अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ भावेश ऊर्फ उदयलाल नानालाल तेली (२३, रा. पिंपळगाव बसवंत, मूळ रा. भिलवाड, राजस्थान) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़
सिडकोच्या गणेश चौकातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीला विवाहित असलेल्या संशयित भावेश तेली याने फूस लावून पळवून नेले़ यानंतर या मुलीस विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केले़
या प्रकरणी या मुलीच्या काकांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या प्रकरणी पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन भावेशला अटक केली़ दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित भावेश तेली विरोधात अपहरण, बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़