मोहाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:01 IST2020-02-07T23:26:25+5:302020-02-08T00:01:06+5:30
मोहाडी येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरवड्यात आठ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा त्याच गावात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातील महिला, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मोहाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरवड्यात आठ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा त्याच गावात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातील महिला, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोहाडी येथून शाळा सुटल्यानंतर रस्त्याने पायी घरी परतणाºया मुलीला संशयित आरोपी कार्तिक तानाजी पवार (१९) राहणार खडक सुकेणे, ता. दिंडोरी याने जवळील द्राक्ष बागेत ओढत नेऊन अत्याचार केला. आई वडील घरी आल्यानंतर मुलीने घडलेली घटना सांगितली. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ दिंडोरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ५०६ पोक्सो कायदा कलम चार व आठ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण आव्हाड, शंकर जाधव करत आहेत.