अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:28 IST2020-01-12T00:00:41+5:302020-01-12T01:28:04+5:30
मालेगाव : चॉकलेटचे आमिष दाखवून सहावर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार करणाºया राकेश ऊर्फ बापू देवराम रौंदळ (२२) या नराधमाला वडनेर ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
मालेगाव : चॉकलेटचे आमिष दाखवून सहावर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार करणाºया राकेश ऊर्फ बापू देवराम रौंदळ (२२) या नराधमाला वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील तळवाडे दुंधे येथे हा निंदनीय प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणाºया राकेश रौंदळ याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अपहरण मारहाण करून बालअत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. पाटील करीत आहेत.